-: दिनविशेष :-

३१ ऑगस्ट

साटंलोटं:- त्याचं अमक्याशी साटंलोटं आहे असा वाक्प्रयोग आपण बर्‍याचदा ऐकतो. ‘साटंलोटं असणं’ म्हणजे नेमकं काय? साटंलोटं ही विवाहाची एक पद्धत असून त्यात बायकोच्या भावाला नवर्‍याची बहीण दिली जाते. मुलीच्या विवाहात द्याव्या लागणार्‍या हुंड्याची समस्या सोडवण्यासाठी ही प्रथा रुढ झाली असावी. थोडक्यात, ज्या घरात मुलगी द्यायची तेथील मुलगी आपल्या घरात आणायची म्हणजे आपापसात साटंलोटं होतं!

महत्त्वाच्या घटना:

१९९७

डायना आणि डोडी अल फायेद

प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद हे पॅरिसमधे एका कार अपघातात ठार झाले.

(Image Credit:  @yourewrongabout)

१९९१

किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९७०

विवेकानंद स्मारक

राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

(Image Credit: Trans India Travels)

१९९६

पांडुरंगशास्त्री आठवले

पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(Image Credit: Ramon Magsaysay Award Foundation)

१९६२

त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५७

मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७

भारताची प्रमाणवेळ (Indian Standard Time) निश्चित करण्यात आली.

१९२०

खिलाफत चळवळीची सुरूवात

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९

जवगल श्रीनाथ

जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज

(Image Credit: ESPN CricInfo)

१९४४

क्लाईव्ह लॉईड

क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

(Image Credit: ESPN CricInfo)

१९४०

शिवाजी सावंत

शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ‘मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे.
(मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

(Image Credit: Library Mantra)

१९३१

जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक
(मृत्यू: १० जुलै २००५)

१९१९

अमृता प्रीतम

अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ‘कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ‘रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ३१ आक्टोबर २००५ - नवी दिल्ली)

(Image Credit: Wikipedia)

१९०७

रॅमन मॅगसेसे

रॅमन डेल फिएरो मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: ३० डिसेंबर १९५३ - १७ मार्च १९५७)
(मृत्यू: १७ मार्च १९५७)

(Image Credit: Ramon Magsaysay Award Foundation)

१९०२

दामू धोत्रे

दामू धोत्रे – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक. ‘वाघ, सिंह माझे सखे सोबती’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ? ? १९७२)

(Image Credit: BBC)

१८९३

नारायण धोंडोपंत तथा ना. धों. ताम्हनकर – लेखक
(मृत्यू: ५ जानेवारी १९६१)

१८७०

मारिया माँटेसरी
Artist and Date unknown

मारिया टेकला आर्टेमिसिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ‘माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.
(मृत्यू: ६ मे १९५२)

(Image Credit: विकिपीडिया)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य
(जन्म: ७ एप्रिल १९३८)

१९९५

‘खलिस्तानी’ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या
(जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)

१९७३

ताराबाई मोडक

ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे. पद्मभूषण (१९६२), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य. थोर समाजसेविका अनुताई वाघ या त्यांच्या शिष्या आहेत.
(जन्म: १९ एप्रिल १८९२)

(Image Credit: Podar Institute)

१४२२

हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: १६ सप्टेंबर १३८६)Pageviews

This page was last modified on 30 August 2021 at 3:28pm