-: दिनविशेष :-

९ आक्टोबर

जागतिक टपाल दिन

World Post Day


महत्त्वाच्या घटना:

१९८१

फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

१९६२

युगांडाचा ध्वज

युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Wikipedia)

१९६०

विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८०६

प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६

डेव्हिड कॅमरुन

डेव्हिड कॅमरुन – इंग्लंडचे पंतप्रधान

(Image Credit: Toby Melville—Reuters)

१८७७

पण्डित गोपबंधूदास

पण्डित गोपबंधूदास तथा ‘उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
(मृत्यू: १७ जून १९२८)

(Image Credit: Wikipedia)

१८७६

पंडित धर्मानंद कोसंबी

पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ञ
(मृत्यू: ४ जून १९४७ - सेवाग्राम, वर्धा)

(Image Credit: Wikipedia)

१८५२

एमिल फिशर

हरमन एमिल लुइस फिशर तथा एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १५ जुलै १९१९)

(Image Credit: The Nobel Prize)

१७५७

चार्ल्स (दहावा)
फ्रँकॉईस गेरॉर्ड याने काढलेले प्रतिमाचित्र

चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५

एन. रामाणी

एन. रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक
(जन्म: १५ ऑक्टोबर १९३४)

(Image Credit: SoundCloud)

१९९९

मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खूष होऊन त्यांना ‘नूतन पेंढारकर’ हे नाव प्रदान केले.
सह्याद्री वाहिनीवरील मुखवटे आणि चेहरे या कार्यक्रमातील अनंत दामले यांची मुलाखत पहा (५१:४६):


(जन्म: १८ सप्टेंबर १९१५)

१९९८

जयवंत पाठारे

जयवंत पाठारे – ‘आह’, ‘अनाडी’, ‘अनुराधा’, ‘छाया’, ‘सत्यकाम’, ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)
(जन्म: ८ नोव्हेंबर १९२१)

(Image Credit: Cinemaazi)

१९८७

गुरू गोपीनाथ

पेरुमानूर गोपीनाथन पिल्ले तथा गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक
(जन्म: २४ जून १९०८)

(Image Credit: Guru Gopinath Natanagramam)

१९५५

गोविंदराव टेंबे

गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.
(जन्म: ५ जून १८८१)

१९१४

विनायक कोंडदेव ओक

विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ‘बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्‍नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
(जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

१८९२

लोकहितवादी

रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ‘लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. ‘लक्ष्मीज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्त्रावरील पहिला मराठी ग्रंथ आहे.
(जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

(Image Credit: मराठी विश्वकोश)Pageviews

This page was last modified on 15 October 2021 at 1:20pm