भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ‘इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर
छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ‘सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
(Image Credit: India Post, Government of India, GODL-India, via Wikimedia Commons)
पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ‘फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.
‘चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा
पिसाच्या मनोर्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल
कृष्ण बलवंत तथा कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात’ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे उज्ज्वला, उर्मिला, अनुबंध असे अनेक कवितासंग्रह व सायसाखर (बालगीते) व ‘मृगावर्त’ हे
खंडकाव्य प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९१९)
डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक
(मृत्यू: २८ एप्रिल १९९२)
‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ‘संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली.
(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)
(Image Credit: Facebook)
अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: ९ जुलै १८५६)
पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता
(मृत्यू: १४ जून १८२५)
शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
(जन्म: १ जानेवारी १९१८)
जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार
(जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांनी ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक मराठी नाट्य-रंगभूमीला दिले. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्य कलेचे “भरतमुनी” म्हणून केला जातो. त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्यकवितासंग्रह’ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.
(जन्म: ? ? १८१८)
होरिकावा – जपानी सम्राट
(जन्म: ८ ऑगस्ट १०७८)
ट्राजान – रोमन सम्राट
(जन्म: १८ सप्टेंबर ५३)
This page was last modified on 03 October 2021 at 6:27pm