-: दिनविशेष :-

१३ डिसेंबर

नागरी संरक्षण दिन

माल्टाचा प्रजासत्ताक दिन


महत्त्वाच्या घटना:

२००१

जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.

१९९१

मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४१

दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३०

‘प्रभात‘चा ‘उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ‘स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

मनोहर पर्रीकर
२०१७ मधील अधिकृत छायाचित्र

मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
(मृत्यू: १७ मार्च २०१९)

(Image Credit: Wikipedia)

१८९९

पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (Cinematographer), ‘हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ‘छाया’, ‘धर्मवीर’, ‘प्रेमवीर’ (१९३७), ‘ज्वाला’ (१९३८), ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’ (१९३९), ‘देवता’, ‘सुखाचा शोध’ (१९३९), ‘लग्न पहावं करुन’ (१९४०), ‘अर्धांगी’ (१९४०), ‘पहिला पाळणा’, ‘भक्त दामाजी’ (१९४२), ‘पैसा बोलतो आहे’ (१९४३), ‘रामशास्त्री’ (१९४४), ‘लाखारानी’ (१९४५), ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले.
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ - मुंबई)

१८०४

मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
(मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)

१७८०

योहान वुल्फगँग डोबेरायनर – मूलद्रव्यांच्या शास्त्रशुद्ध वर्गीकरणाचा प्रथमच प्रयत्न करणारा जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २४ मार्च १८४९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६

श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार
(जन्म: ? ? ????)

१९९४

विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी
(जन्म: १७ आक्टोबर १९१७ - कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)

१९८६

स्मिता पाटील
अमोल पालेकर बरोबर (भूमिका - १९७७)

स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जैत रे जैत’, ‘गमन’, ‘चक्र’, ‘उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड
(जन्म: १७ आक्टोबर १९५५ - पुणे)

(Image Credit: scroll.in)

१९६१

अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ‘ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ? ? १८६०)

१९३०

फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)

१७८४

सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत
(जन्म: १८ सप्टेंबर १७०९)Pageviews

This page was last modified on 12 December 2021 at 9:16pm