नरेंद्र मोदी यांनी भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
(Image Credit: Wikipedia)
श्रीहरिकोटा येथून ‘पी. एस. एल. व्ही. - सी. २’ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले. या उड्डाणाद्वारे भारताने प्रथमच उपग्रह प्रक्षेपणाची सेवा देणार्या जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला.
मुंबईजवळच्या ‘न्हावा-शेवा’ बंदराचे उद्घाटन झाले.
युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.
बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.
निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.
सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा करुन विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदविला. कपिलदेवने १८९३ मधे झिम्बाब्वे विरुद्ध केलेल्या १७५ धावांचा विक्रम गांगुलीने मोडला.
विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री
(मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र कादंबरीकार आणि ४०० हून अधिक ग्रंथांचे प्रकाशक
(मृत्यू: २२ जुलै १९८४)
बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८), इंडीयन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक, तांबेरा
रोगाला दाद न देणार्या व अधिक उत्पादन देणार्या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
(मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)
सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ‘कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक
(मृत्यू: २७ जानेवारी १९६८)
राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ‘गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ‘बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत.
‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ‘वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या
आहेत.
(मृत्यू: २३ जानेवारी १९१९)
अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)
श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक. ‘तुमचे स्थान कोणते’, ‘कौटुंबिक हितगुज’, ‘दाणे आणि खडे’, ‘नवी घडी नवे जीवन’, ‘नव्या
जीवनाची छानदार घडी’ इत्यादि पुस्तकाचे लेखन त्यांनी केले.
(जन्म: ५ मार्च १९१०)
प्रभाकर शिरुर – चित्रकार
(जन्म: ? ? ????)
मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
(जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज]
(जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)
सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
(जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)
This page was last modified on 26 May 2021 at 2:34pm