-: दिनविशेष :-

५ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

२००४

पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

२००३

भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

१९६२

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

१९५८

७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

१९५२

स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

१९४८

गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

१९४५

दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.

१९२२

रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

१९१९

चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

१७६६

माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट

१२९४

अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६

अभिषेक बच्‍चन – अभिनेता

१९३६

बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार

१९३३

गिरीजा कीर

गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
(मृत्यू: ३१ ऑक्टोबर २०१९ - वांद्रे, मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१९१४

शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)

१९०५

अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते
(मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

१८४०

जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक
(मृत्यू: २३ आक्टोबर १९२१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता
(जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

२००८

महर्षी महेश योगी – योग गुरू
(जन्म: १२ जानेवारी १९१७)

२००३

गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या ‘हरिजन’च्या मराठी आवृत्तीचे संपादक
(जन्म: ? ? ????)

२०००

कालिंदी केसकर – गायिका
(जन्म: ? ? ????)

१९२७

हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक
(जन्म: ५ जुलै १८८२)

१९२०

विष्णुबुवा जोग

आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह तथा विष्णुबुवा जोग यांनी समाधि घेतली.
(जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

(Image Credit: दैनिक प्रहार)



Pageviews

This page was last modified on 30 October 2021 at 11:49pm