-: दिनविशेष :-

१३ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००८

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.

१९९६

डॉ. इंदुमती पारिख

महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या महिलेला देण्यात येणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. इंदुमती पारिख यांना देण्यात आला.

(Image Credit: Jamnalal Bajaj Awards)

१९८९

आर्चबिशप डेसमंड टुटू

आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.

(Image Credit: Wikipedia)

१९४८

ऑपरेशन पोलो – भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. अखेर १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली. या शरणागतीनंतर भयानक धार्मिक दंगली उसळल्या. या दंगली उसळण्यामागे भारतीय सैन्यदलाचा हात असल्याचे आरोप झाले. त्यांची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘सुंदरलाल समिती’ नेमली. मात्र या समितीचा अहवाल २०१३ पर्यंत प्रकाशितच केला गेला नाही. या अहवालानुसार सुमारे ३० ते ४० हजार लोक या दंगलीत ठार झाले. मात्र यात सुमारे दोन लाख लोक ठार झाले असावेत असे काहींचे म्हणणे आहे.

१९२२

लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६

क्रेग मॅकमिलन

क्रेग मॅकमिलन – न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू

(Image Credit: Wikipedia)

१९७१

गोरान इव्हानिसेव्हिच

गोरान इव्हानिसेव्हिच – क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू

(Image Credit: Tennis Hall of Fame)

१९६९

शेन वॉर्न

शेन वॉर्न – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर. ४ जून १९९३ रोजी ॲशेस मालिकेतील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटी सामन्यात शेन वॉर्न याने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटींग याला एक विलक्षण चेंडू टाकून त्रिफळाचित केले. खुद्द गॅटींगने या चेंडूचे वर्णन ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे केले आहे.

(Image Credit: SPORTSTAR)

१९६७

Embed from Getty Images

मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २०० मी व ४०० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. ४०० मी धावण्याच्या शर्यतीत सलग दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवणाराही तो एकमेव खेळाडू आहे.

१९३२

डॉ. प्रभा अत्रे

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे – शास्त्रीय गायिका, पद्मश्री (१९९०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), पद्मभूषण (२००२)

(Image Credit: Hindustan Times)

१८८६

सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५)

१८५७

मिल्टन हर्शे
१९०५ मधील छायाचित्र

मिल्टन हर्शे – ‘द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक
(मृत्यू: १३ आक्टोबर १९४५)

(Image Credit: Wikipedia)

१८५२

गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे १९१७ मध्ये झालेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(मृत्यू: १३ जुलै १९१९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
(जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)

१९९७

अंजान

लालजी पाण्डेय तथा ‘अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांसाठी १५०० हुन अधिक गाणी लिहिली. त्यामध्ये बहारें फिर भी आयेगी (१९६६), कब? क्यूँ? और कहाँ? (१९७०), राजा काका (१९७५), अपने रंग हजार (१९७५), खान दोस्त (१९७६), दो अंजाने (१९७६), खून पसीना (१९७७), पापी (१९७७), कसम खून की (१९७७), विश्वनाथ (१९७८), गंगा की सौगंध (१९७८), बदलते रिश्ते (१९७८), डॉन (१९७८), मुकद्दर का सिकंदर (१९७८), मुकद्दर (१९७८), दो और दो पाँच (१९८०), लावारिस (१९८१), याराना (१९८१), नमक हलाल (१९८२), महान (१९८३), बंधन कच्चे धागोंका (१९८३), शराबी (१९८४) इत्यादी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मात्र डॉन चित्रपटातले ‘खाईके पान बनारसवाला ...’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल.
(जन्म: २८ आक्टोबर १९३० - वाराणसी, उत्तर प्रदेश)

(Image Credit: Wikipedia)

१९९५

डॉ. महेश्वर निओग

डॉ. महेश्वर निओग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष
(जन्म: ७ सप्टेंबर १९१५ - कमरफादिया, शिवसागर, आसाम)

१९७१

केशवराव दाते
केशवराव दाते, राजा नेने आणि शांता आपटे (कुंकू - १९३७)

केशवराव त्र्यंबक दाते– चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या.
(जन्म: २४ सप्टेंबर १८८९ - अडिवरे, रत्‍नागिरी, महाराष्ट्र)

(Image Credit: Wikipedia)

१९२९

जतिन दास
१९२९ मधील छायाचित्र

लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.
(जन्म: २७ आक्टोबर १९०४)

(Image Credit: Wikipedia)

१९२६

श्रीधर पाठक

श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(जन्म: ११ जानेवारी १८५८)

(Image Credit: Bharat Discovery)

१८९३

मामा परमानंद

नारायण महादेव तथा मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
(जन्म: ३ जुलै १८३८)

(Image Credit: Wikimedia Commons)

८१

टायटस – रोमन सम्राट
(जन्म: ३० डिसेंबर ३९)Pageviews

This page was last modified on 11 September 2021 at 10:34pm