फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
अनंत काणे यांनी ‘अभिजात’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर ‘गुंतता ह्रुदय हे’, ‘सूर राहू दे’, ‘सुरूंग’, ‘हसत हसत फसवुनी’, ‘मला भेट हवी हो’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘गहिरे रंग’, ‘आनंदी गोपाळ’, ‘वर्षाव’ अशा अनेक दर्जेदार नाटकांच्या निर्मितीद्वारे आपला ठसा उमटवला.
‘प्रभात फिल्म कंपनी’ विसर्जित करण्यात आली. १ जून १९२९ रोजी विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने या कंपनीची स्थापना केली होती.
(Image Credit: विकिपीडिया)
फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.
लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
परवेझ फतेह अली खान उर्फ नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक, यांच्या घराण्यात ६०० वर्षे कव्वाली गायकीची परंपरा आहे.
(मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७ - लंडन, इंग्लंड)
(Image Credit: @cinemaazi)
मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान
(मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
(Image Credit: The Guardian)
अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या
(मृत्यू: १० डिसेंबर २००१)
(Image Credit: Wikipedia)
शंकर रामचंद्र तथा ‘अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ‘गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.
(मृत्यू: ६ मे १९४६)
(Image Credit: Live Law)
कोकिळा किशोरचंद्र बलसारा तथा निरुपा रॉय – चित्रपट अभिनेत्री. त्यांनी सुमारे २५० हुन अधिक चित्रपटात भूमिका केल्या. नायकाच्या आईची भूमिका अनेकदा त्यांच्या वाट्याला येत असे.
(जन्म: ४ जानेवारी १९३१ - वलसाड, गुजरात)
(Image Credit: Wikipedia)
डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, सामाजिक कार्यकर्त्या आणि लोकहिताबुद्धी, पुणे जिल्हा रेड क्रॉसच्या अध्यक्षा, पद्मश्री (१९८२), ‘सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया‘च्या संचालिका
(जन्म: ? ? ????)
आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी’ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ‘दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.
(जन्म: ४ ऑगस्ट १९२९ - खांडवा, मध्य प्रदेश)
(Image Credit: IMDb)
मिल्टन हर्शे – ‘द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक
(जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
(Image Credit: Wikipedia)
मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता’ ठेवले.
(जन्म: २८ आक्टोबर १८६७ - उत्तर आर्यलंड, यू. के.)
(Image Credit: Wikipedia)
This page was last modified on 26 October 2021 at 11:13pm