एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला. अगदी अलीकडेच म्हणजे १० डिसेंबर २००४ रोजी या लघुग्रहाचा शोध लागला होता.
(Image Credit: Wikipedia)
सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
आय. एन. एस. विक्रांत (R11) या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी? मान्यता दिली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनने १९४७ साली सेवेतून काढून टाकलेली ही युद्धनौका भारताने १९५७ मध्ये खरेदी केली आणि ४ मार्च १९६१ रोजी ती भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली. ३१ जानेवारी १९९७ पर्यंत ती नौदलाच्या सेवेत होती.
(Image Credit: Wikipedia)
‘ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
‘मॅलार्ड’ हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. सद्ध्या वाफेची इंजिने बनवत नाहीत हे ही त्यामागचे एक कारण असावे.
(Image Credit: Popular Mechanics)
आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
डाऊ जोन्स (DJIA) हा अमेरिकेच्या शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ‘कोहिनूर’ (कोह-इ-नूर = Mountain of Light) हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
(Image Credit: Wikipedia)
महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली.
हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू
सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी
(मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
(मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
(मृत्यू: १६ जून १९७७)
बॅरिस्टर व्ही. एम. तथा ‘भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ
(मृत्यू: २२ मार्च २००४)
रामचंद्र दत्तात्रय तथा ‘गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
(मृत्यू: ६ जून १९५७)
मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
(मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)
ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स’चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक
(जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
संत नामदेव यांनी समाधी घेतली.
(जन्म: २९ आक्टोबर १२७०)
This page was last modified on 07 October 2021 at 10:20am