-: दिनविशेष :-

७ सप्टेंबर

ब्राझिलचा स्वातंत्र्यदिन

वेद दिन

वायूसेना दिन (पाकिस्तान)


महत्त्वाच्या घटना:

२००५

इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

१९७९

दिवाळखोरी टाळण्यासाठी ‘ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

१९७८

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९३१

दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९१९

नवजीवन

महात्मा गांधींनी ‘नवजीवन’ हे गुजराथी साप्ताहिक सुरू केले.

(Image Credit: mkgandhi.org)

१९०६

Bank of India Logo

बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१८२२

ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८१४

खांदेरी किल्ला
खांदेरी किल्ला

दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ‘उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

(Image Credit: Yacht Tours, Mumbai)

१६७९

सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१

प्रतीक चौधरी

प्रतीक चौधरी – सानिया घराण्याचे सतारिये, दिल्ली विद्यापीठातील संगीताचे प्राध्यापक
(मृत्यू: ७ मे २०२१ [कोविड-१९])

(Image Credit: @1anuradhapal)

१९४०

चंद्रकांत खोत

चंद्रकांत खोत – लेखक, कवी आणि संपादक. अतिशय मनस्वी आणि तरीही अलिप्त असे साहित्यिक म्हणून खोत यांची ओळख होती. विवेकानंद यांच्या आयुष्यावरची ‘बिंब-प्रतिबिंब’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. तसंच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या नात्यावरची ‘दोन डोळे शेजारी’ ही त्यांची कादंबरीही खूप गाजली.
 ‘अबकडई’ या दिवाळी अंकाचं संपादनही त्यांनी केलं होतं. खोत यांनी धाडसी लिखाणही केलं होतं. मुंबईतल्या पुरूष वेश्यांच्या जीवनावरची ‘उभयान्वयी अव्यय’ ही त्यांची कादंबरी बरीच गाजली.
(मृत्यू: १० डिसेंबर २०१४ - मुंबई)

(Image Credit: News-18 लोकमत)

१९३४

सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
(मृत्यू: २३ आक्टोबर २०१२)

१९३४

बी. आर. इशारा

बाबू राम तथा बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
(मृत्यू: २५ जुलै २०१२)

(Image Credit: Cinestaan)

१९३३

इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील व ‘सेवा’ [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका

इला भट यांचा परिचय करून देणारा व्हिडीओ पहा (१३:४०):

१९२५

भानुमती रामकृष्ण
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका, पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (२००१)
(मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

(Image Credit: Wikipedia)

१९१५

डॉ. महेश्वर निओग

डॉ. महेश्वर निओग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

१९१२

डेव्हिड पॅकार्ड

डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक, अमेरिकेचे संरक्षण राज्यमंत्री (Deputy Secretary of Defense)
(मृत्यू: २६ मार्च१९९६)

(Image Credit: Wikipedia)

१८४९

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

‘गायनाचार्य’ बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतातील ‘भीष्माचार्य’, त्यांनी ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे त्यांचे शिष्य आहेत.
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)

(Image Credit: लोकसत्ता)

१८२२

भाऊ दाजी लाड

डॉ. रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, प्राचीनवस्तू संग्राहक, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी, मुंबईचे नगरपाल (१८६९ आणि १८७१). प्राचीन नाण्यांचा त्यांचा संग्रह बराच मोठा होता. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून १९७५ मध्ये ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’चे नामकरण ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ असे करण्यात आले.
(मृत्यू: ३१ मे १८७४)

(Image Credit: भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय)

१७९१

उमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक
(मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७

मुकूल आनंद

मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ११ आक्टोबर १९५१)

(Image Credit: IMDb)

१९९४

टेरेन्स यंग

स्टुअर्ट टेरेन्स हर्बर्ट यंग – आयरिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार. ‘डॉक्टर नो’, ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ आणि ‘थंडरबॉल’ या बॉन्डपटांचे दिग्दर्शक
(जन्म: २० जून १९१५ - शांघाय, चीन)

(Image Credit: Wikipedia)

१९९१

रवि नारायण रेड्डी – ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’चे सहसंस्थापक
(जन्म: ५ जून १९०८)

१९७९

जे. जी. नवले

जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.’ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
(जन्म: ७ डिसेंबर १९०२)

(Image Credit: cricHQ)

१९५३

भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ‘फुलारी’ ऊर्फ ‘बी. रघुनाथ’ – लेखक व कवी
(जन्म: १५ ऑगस्ट १९१३)Pageviews

This page was last modified on 23 December 2021 at 8:12pm