-: दिनविशेष :-

१६ ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

२०१०

जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

१९९४

बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ‘कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर

१९६०

सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४६

कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

१९१३

स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री

१९७०

सैफ अली खान – अभिनेता

१९५८

मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका

१९५४

हेमलता – पार्श्वगायिका

१९५२

कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री

१९५०

जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९१३

मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते
(मृत्यू: ९ मार्च १९९२)

१९०४

सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री
(मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)

१८७९

जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ‘महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले आहेत.
(मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१८

अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण (१९९२), भारतरत्न (२०१५)
(जन्म: २५ डिसेंबर १९२४)

२०१०

नारायण सुर्वे

नारायण गंगाराम सुर्वे – कवी
(जन्म: १५ आक्टोबर १९२६)

(Image Credit: साप्ताहिक साधना)

२००३

इदी अमीन – युगांडाचा हुकुमशहा
(जन्म: १९२० च्या आसपास)

२०००

रेणू सलुजा – ‘परिंदा’, ‘धारावी’, ‘सरदार’ आणि ‘गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक
(जन्म: ५ जुलै १९५२ - नवी दिल्ली)

१९९७

अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन
(जन्म: ? ? ???? - पेडणे, गोवा)

१९९७

नुसरत फतेह अली खान
रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन

परवेझ फतेह अली खान उर्फ नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक
(जन्म: १३ आक्टोबर १९४८ - फैसलाबाद, पंजाब, पाकिस्तान)

(Image Credit: Wikipedia)

१९७७

एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ‘किंग ऑफ द रॉक अँड रोल’
(जन्म: ८ जानेवारी १९३५)

१८८६

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली.
(जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ - कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

१७०५

जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ
(जन्म: २७ डिसेंबर १६५४)Pageviews

This page was last modified on 14 October 2021 at 11:16pm