भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘बुकर पुरस्कार’ मिळाला.
(Image Credit: Wikipedia)
वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर
(Image Credit: The Guardian)
टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व भारतातील नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन ‘एअर इंडिया’ ही कंपनी अस्तित्त्वात आली व सरकारी कामकाज पद्धतीप्रमाणे पुढे तिचा बोऱ्या वाजला. कालांतराने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा उद्योगसमूहाने ही कंपनी पुन्हा विकत घेतली!
(Image Credit: scroll.in)
पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
(Image Credit: Art Pickles)
गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘सुधारक’ पत्राची सुरूवात
मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका, पद्मभूषण (२०१२)
(Image Credit: Wikipedia)
अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकिर हुसेन (१९६३) या भारतरत्न मिळालेल्या व्यक्ति पुढे राष्ट्रपती झाल्या.
(मृत्यू: २७ जुलै २०१५ - शिलॉंग, मेघालय)
(Image Credit: Wikipedia)
शंकर सिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
(मृत्यू: २६ एप्रिल १९८७ - मुंबई)
(Image Credit: Shankar-Jaikishan)
मारिओ पुझो – अमेरिकन लेखक, कादंबरीकार, पटकथाकार व पत्रकार. त्यांच्या कादंबरीवर निघालेल्या ‘द गॉडफादर’ या चित्रपटाला १९७२ सालचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
(मृत्यू: २ जुलै १९९९)
(Image Credit: Wikipedia)
जॉन केनेथ तथा जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी, भारतातील अमेरिकेचे ७ वे राजदूत
(मृत्यू: २९ एप्रिल २००६)
(Image Credit: Britannica)
इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक
(मृत्यू: २५ आक्टोबर १६४७ - फ्लोरेन्स, इटली)
(Image Credit: Chemistry World)
बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट
(मृत्यू: १२ आक्टोबर १६०५ - फतेहपुर, सिक्री, उत्तर प्रदेश)
(Image Credit: GK India Today)
रघुनाथ दामोदर तथा वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार. ‘विच्छा माझी पुरी करा’ (१९६८) ह्या त्यांच्या लोकनाटयाने यशस्वितेचा विक्रम केला.
(जन्म: ६ डिसेंबर १९२३)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ‘सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते.
(जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)
हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी
(जन्म: १२ जानेवारी १८९३)
हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती
(जन्म: २६ फेब्रुवारी १८६६)
साई बाबा
(जन्म: ? ? ????)
माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर
(जन्म: ७ ऑगस्ट १८७६)
रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात १५७१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते.
(जन्म: ? ? १७२०)
This page was last modified on 15 October 2021 at 7:02pm