युरोपिअन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया व लिथुआनियाच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
मोल्डोव्हाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
नाट्यसंपदा निर्मित, वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘अश्रूंची झाली फुले‘ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.
मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी विकसित केलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
(Image Credit: This Day in Aviation)
नारायण धारप – रहस्यकथाकार
(मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)
वि. रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक
(मृत्यू: १५ एप्रिल २०१३)
सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ‘गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व
कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले. ‘जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: १४ आक्टोबर १९९४)
सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला.
(मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)
लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २२ जानेवारी १९७३)
सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (मृत्यू: ३ जून १९३२)
गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ‘वर्हाडचे नबाब’
(मृत्यू: १ जुलै १९३८)
हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक, संकलक आणि लेखक. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनाडी, सत्यकाम, चुपके चुपके, अनुपमा, आनंद, अभिमान, गुड्डी, गोल माल, आशीर्वाद, बावर्ची, खूबसूरत, नमक हराम इ. ४२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) तसेच केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाचे (CBFC) अध्यक्ष. दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९९), पद्मविभूषण (२००१) इ. पुरस्कारांनी सन्मानित.
(जन्म: ३० सप्टेंबर १९२२)
(Image Credit: Bollywoodirect)
मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री
(जन्म: ? ? १९२८)
द. शं. तथा ‘दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१९)
मधू मेहता – हिन्दुस्तान आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: ? ? ????)
लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
(जन्म: २५ जून १९००)
मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश’ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर
आणि गायकीत ओतप्रोत भरलेला ‘दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती.
(जन्म: २२ जुलै १९२३)
जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ‘महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले आहेत.
(जन्म: १६ ऑगस्ट १८७९)
This page was last modified on 29 September 2021 at 10:59pm