-: दिनविशेष :-

५ जुलै

महाकवी कालिदास दिन


महत्त्वाच्या घटना:

२००९

अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

१९९७

स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्‍नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.

१९९६

संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ‘आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर

१९७७

पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात

१९७५

विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.

१९७५

‘केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७५

‘देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

१९६२

अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५४

आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९५०

इस्रायेलच्या संसदेने (क्‍वेन्सेट) जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

१९२३

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली.

१९१३

किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.

१८८४

जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१८३०

फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८११

व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४

जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९५२

रेणू सलुजा – ‘परिंदा’, ‘धारावी’, ‘सरदार’ आणि ‘गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक
(मृत्यू: १६ ऑगस्ट २००० - मुंबई)

१९४६

राम विलास पासवान

राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, लोकसभा खासदार (९ वेळा), राज्यसभा खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
(मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२० - नवी दिल्ली)

(Image Credit:  @irvpaswan)

१९२५

नवल किशोर शर्मा

नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
(मृत्यू: ८ आक्टोबर २०१२)

(Image Credit: पत्रिका)

१९२०

आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
(मृत्यू: ४ एप्रिल १९९६)

१९१६

के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ‘युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक
(मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

१८८२

हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक
(मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५

भरा

बाळकृष्ण पंढरीनाथ तथा बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज
(जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

(Image Credit: Cricket Country)

१९९६

चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ‘बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार
(जन्म: ????)

१८२६

सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी
(जन्म: ६ जुलै १७८१)



Pageviews

This page was last modified on 07 October 2021 at 10:23pm