-: दिनविशेष :-

९ मार्च


महत्त्वाच्या घटना:

१९९२

कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

१९९१

युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने

१९५९

‘बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

१९४५

दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

शशी थरूर – केन्द्रीय मंत्री, लेखक व मुत्सदी

१९५१

उस्ताद झाकिर हुसेन – पंजाब घराण्याचे जगप्रसिद्ध तबलावादक

१९४३

रॉबर्ट जेम्स ऊर्फ ‘बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर
(मृत्यू: १७ जानेवारी २००८)

१९३४

युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर
(मृत्यू: २७ मार्च १९६८)

१९३०

सोली सोराबजी

सोली जहांगीर सोराबजी – ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया (७ एप्रिल १९९८ ते ४ जून २००४), सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (१९७७ ते १९८०), पद्मविभूषण (२००२), ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ चे अध्यक्ष
(मृत्यू: ३० एप्रिल २०२१ - नवी दिल्ली)

(Image Credit: Financial Express)

१९१७

ओम प्रकाश भंडारी उर्फ क़मर जलालाबादी – गीतकार व कवी
(मृत्यू: ९ जानेवारी २००३ - मुंबई )

१८९९

‘राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले.
(मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

१८६३

लक्ष्मण बापूजी ऊर्फ ‘भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट
(मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१७

वि. भा. देशपांडे

विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे – नाट्यसमीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. वि.भा. देशपांडे यांची इ.स. २०१५ सालापर्यंत जवळपास ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पैकी नाट्यविषयक लेखनाची एकूण २५ पुस्तके आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे: प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
(मृत्यू: ३१ मे १९३८)

(Image Credit: नवा काळ)

२०१२

जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
(जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

२०००

उषा किरण
बादबान (१९५४) या चित्रपटातील दृष्य

उषा मराठे - खेर ऊर्फ ‘उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर भूमिका साकारलेली अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (Sheriff)
(जन्म: २२ एप्रिल १९२९)

(Image Credit: Word Disk)

१९९४

देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित
(जन्म: ३० मार्च १९०८)

१९९२

मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९७१

के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक
(जन्म: १४ जून १९२२)

१९६९

सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ‘होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू
(जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१८८८

विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट
(जन्म: २२ मार्च १७९७)

१८५१

हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ

(जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१६५०

संत तुकाराम
(जन्म: ? ? १५७७)Pageviews

This page was last modified on 31 May 2021 at 10:45pm