-: दिनविशेष :-

६ जुलै


महत्त्वाच्या घटना:

२००६

नाथू ला
भारताच्या हद्दीतून सीमेकडे जाणारा मार्ग

चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ‘नाथू ला’ ही खिंड (ला म्हणजेच खिंड) ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

(Image Credit: CC BY-SA 3.0, Wikimedia Commons)

१९८२

पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

१९४७

रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.

१९१०

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना

१८९२

ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.

१८८५

लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.

१७८५

‘डॉलर’ ($) हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित आहे.

१७३५

मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२

रेखा शिवकुमार बैजल – साहित्यिका

१९४६

जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष

१९३०

डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
(मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१६)

१९२७

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी
(मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

१९२०

डॉ. विनायक महादेव तथा ‘वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक बरेच गाजले.
(मृत्यू: ३० जुलै १९९५)

१९०५

लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)

१९०१

डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
(मृत्यू: २३ जून १९५३)

१८८१

संत गुलाबराव महाराज
२०१८ मध्ये जरी केलेले टपाल तिकीट

गुलाब गोंडोजी मोहोड तथा संत गुलाबराव महाराज   स्वतः अंध असूनही अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात हजारो लोकांना मार्ग दाखवण्याचे कार्य गुलाबरावमहाराजांनी केले. त्यांनी विविध विषयांवर १३९ पुस्तके लिहिली तर सुमारे २५,००० कडव्यांची काव्यरचना केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्‍नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला.
(मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)

(Image Credit: Wikipedia)

१८६२

एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज
(मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

१८३७

सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक
(मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

१७८१

सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी
(मृत्यू: ५ जुलै १८२६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

धीरुभाई अंबानी – उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक
(जन्म: २८ डिसेंबर १९३२)

१९९९

एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज
(जन्म: ३ मार्च १९३९)

१९९७

चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
(जन्म: ३ जानेवारी १९२१)

१९८६

‘बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान
(जन्म: ५ एप्रिल १९०८)

१८५४

जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १६ मार्च १७८९)

भरा

भरा



Pageviews

This page was last modified on 18 September 2021 at 7:52pm