-: दिनविशेष :-

३ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००५

स्टीव्ह फॉसेट यांनी ‘ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

२००३

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या ‘शरच्‍चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड

१९९४

जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ‘ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान

१९७७

मुंबईतील नेहरू तारांगण (Nehru Planetarium) सुरु झाले.

१९७३

ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

१९६६

डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.

१९४३

दुसरे महायुद्ध   लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार

१९३०

नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

१८८५

अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१८६५

हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८४५

फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

७८

शालिवाहन शकास प्रारंभ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७

अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर

१९७०

इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९६७

शंकर महादेवन – गायक व संगीतकार

१९५५

जसपाल भट्टी

जसपाल भट्टी – छोट्या पडद्यावरील विनोदी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक, पद्मभूषण (२०१३)
(मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)

(Image Credit: Express Photo)

१९३९

एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज
(मृत्यू: ६ जुलै १९९९)

१९२६

रवि शंकर शर्मा ऊर्फ ‘रवि’ – संगीतकार
(मृत्यू: ७ मार्च २०१२)

१८४७

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक
(मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)

१८४५

जी. कँटर – जर्मन गणितज्ञ
(मृत्यू: ६ जानेवारी १९१८)

१८३९

जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक
(मृत्यू: १९ मे १९०४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९५

पं. निखिल घोष – तबलावादक
(जन्म: ? ? १९१९)

१९८२

रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
(जन्म: २८ ऑगस्ट १८९६)

१९६५

अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री
(जन्म: ? ? १९०६)

१९१९

हरी नारायण आपटे – कादंबरीकार
(जन्म: ८ मार्च १८६४)

१७०७

औरंगजेब – सहावा मोगल सम्राट
(जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)

१७०३

रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक
(जन्म: १८ जुलै १६३५)Pageviews

This page was last modified on 24 October 2021 at 11:26pm