-: दिनविशेष :-

१८ जुलै


महत्त्वाच्या घटना:

१९९६

उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९६

‘तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.

१९८०

भारताने ‘एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.

१९७६

मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.

१९६८

सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना झाली.

१९२५

अ‍ॅडॉल्फ हिटलरने ‘माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

१८५७

मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली.

१८५२

इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

६४

रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले फिडल (तुणतुणे) वाजवत असल्याची कथा प्रसिद्ध आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८२

प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ‘मिस वर्ल्ड २०००’ विजेती

१९७२

सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: १७ एप्रिल २००४)

१९३५

जयेन्द्र सरस्वती – ६९ वे शंकराचार्य

१९२७

‘गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक
(मृत्यू: १३ जून २०१२)

१९१८

नेल्सन मंडेला तथा ‘मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)

१८४८

डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)

१६३५

रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक
(मृत्यू: ३ मार्च १७०३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि लोकसभा सदस्य
(जन्म: २९ डिसेंबर १९४२)

२००१

पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन – सांगलीच्या राजमाता
(जन्म: ? ? १९२१)

२००१

रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू
(जन्म: २८ जून १९३४)

१९९४

डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
(जन्म: ? ? ????)

१९८९

डॉ. गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक
(जन्म: ? ? ????)

१९६९

‘लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक
(जन्म: १ ऑगस्ट १९२०)

१८९२

थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक
(जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)



Pageviews

This page was last modified on 17 June 2021 at 12:50pm