-: दिनविशेष :-

२३ डिसेंबर

राष्ट्रीय किसान दिन


महत्त्वाच्या घटना:

२००१

बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

२०००

कलकत्ता शहराचे नाव ‘कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

१९७०

धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

१९५४

डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.

१९५४

बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९४७

अमेरिकेतील ‘बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.

१९४०

वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट’ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

१९२१

शांतिनिकेतन येथे ‘विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.

१९१४

पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.

१८९३

‘हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०२

चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ‘लोकदल’ पक्षाचे संस्थापक
(मृत्यू: २९ मे १९८७)

१८९७

कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
(मृत्यू: ? ? ????)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ‘युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक
(जन्म: ५जुलै १९१६)

२०१०

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ‘पाऊस’, ‘भरती’, ‘चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ‘दोन बहिणी’, ‘कोंडी’ या कादंबर्‍या व ‘पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: २१ मे १९२८)

२००८

गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक
(जन्म: ३१ जानेवारी १९३१)

२००४

नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री
(जन्म: २८ जून १९२१)

२०००

नूरजहाँ

‘मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री
(जन्म: २१ सप्टेंबर १९२६ - कसुर, पंजाब, भारत)

(Image Credit: IMDb)

१९९८

रत्‍नाप्पा कुंभार

रत्‍नाप्पा भरमाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
(जन्म: १५ सप्टेंबर १९०९ - निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)

(Image Credit: Veethi)

१९७९

दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सुनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी)
(जन्म: ? ? ????)

१९६५

गणेश गोविंद तथा ‘गणपतराव’ बोडस – नट व गायक, ‘गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
(जन्म: २ जुलै १८८०)

१९२६

स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या
(जन्म: २ फेब्रुवारी १८५६)

१८३४

थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ
(जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)Pageviews

This page was last modified on 22 December 2021 at 9:36pm