-: दिनविशेष :-

२७ मार्च

जागतिक रंगभूमी दिन

World Theatre Day

विल्हेम रॉन्टजेनने १८९५ मध्ये शोधलेल्या क्ष-किरणांच्या साहाय्याने कपड्यांचे आवरण टाळून शरीराच्या आतील भागाची छायाचित्रे घेता येतात असे लक्षात आले. ‘क्ष’ किरणांच्या मदतीने स्त्रियांची छायाचित्रे घेतली जातील या भीतीने त्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत काही लोकप्रतिनिधींनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला व तसे विधेयकच प्रस्तावित झाले!

महत्त्वाच्या घटना:

२०००

चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

१९९२

पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान

१९७७

तेनेरिफ द्वीपावरील लॉस रोडिओस विमानतळाच्या धावपट्टीवर पॅन अ‍ॅम फ्लाईट १७३६ आणि के. एल. एम. फ्लाईट ४८०५ या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व के. एल. एम. पायलटच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली.

१९६६

२० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत ‘पिकल्स’ नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९५८

निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१८५४

क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१७९४

अमेरिकन नौदलाची स्थापना झाली

१६६७

शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०१

कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ‘डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार
(मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

१८४५

विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

१७८५

लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ८ जून १७९५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१८

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे – आंबेडकरवादी साहित्यिक व समीक्षक
(जन्म: २८ जून १९३७ - नागपूर)

२०००

हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा ‘प्रिया राजवंश’ यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली. त्यांचे हसते जखम, हिन्दूस्तान की कसम, हीर रांझा, हकीकत हे चित्रपट प्रसिद्ध होते.
(जन्म: ३० डिसेंबर १९३६ - शिमला, हिमाचल प्रदेश)

१९९७

भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक
(जन्म: ? ? ????)

१९९२

प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य
(जन्म: ? ? ????)

१९६८

युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर
(जन्म: ९ मार्च १९३४)

१९६७

जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ‘इलेक्ट्रो केमिकल अ‍ॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
(जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९५२

काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक
(जन्म: ११ जून १८९४)

१८९८

सर सय्यद अहमद खान

सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते
(जन्म: १७ आक्टोबर १८१७)

(Image Credit: Wikipedia)Pageviews

This page was last modified on 16 October 2021 at 8:52pm