-: दिनविशेष :-

३ आक्टोबर


महत्त्वाच्या घटना:

१९९५

आपली भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमन यांच्या खुनाच्या आरोपातून ओ. जे. सिम्पसनची सुटका.

१९९०

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

१९३५

जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

१९३२

इराकचा ध्वज
‘God is the greatest’

इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१७७८

ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.

१६७०

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९

जे. पी. दत्ता

ज्योती प्रकाश तथा जे. पी. दत्ता – निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक

(Image Credit: IMDb)

१९२१

Embed from Getty Images

रेमंड रसेल तथा रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, उजव्या हाताने गोलंदाजी करणारे जलदगती गोलंदाज
(मृत्यू: २३ जून १९९६)

१९१९

जेम्स बुकॅनन

जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते (१९८६) अमेरिकन अर्थतज्ञ
(मृत्यू: ९ जानेवारी २०१३)

(Image Credit: The Nobel Prize)

१९१७

माधवराव शिंदे
फिल्म फेअर पुरस्कार (१९७५)

माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ‘कन्यादान’, ‘धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ‘शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे मायेचा पाझर, संसार [उर्मिला मातोंडकरचा पहिला चित्रपट] हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. सुमारे १०० हुन अधिक चित्रपटांचे संकलन त्यांनी केले आहे. त्यांपैकी राज (१९६७), ब्रम्हचारी (१९६८), सीता और गीता (१९७२), शोले (१९७५), शान (१९८०), शक्ती (१९८२), रझिया सुलतान (१९८३), सोहनी महिवाल (१९८४), सागर (१९८५), चमत्कार (१९९२) हे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत. शोले या चित्रपटाच्या संकलनासाठी त्यांना १९७५ चा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
(मृत्यू: २० ऑगस्ट १९८८)

(Image Credit: Wikipedia)

१९१४

म. वा. धोंड

मधुकर वासुदेव तथा म. वा. धोंड – समीक्षक व टीकाकार. प्रा. म. वा. धोंड यांनी आपल्या मर्मग्राही, धारदार लेखनाने गेल्या पन्नास-साठ वर्षांतील मराठी समीक्षा क्षेत्रावर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ‘काव्याची भूषणे’, ‘मऱ्हाटी लावणी’, ‘ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य’, ‘चंद्र चवथिचा’, ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’, ‘जाळ्यातील चंद्र’, ‘ऐसा विटेवर देव कोठें।’, ‘तरीहि येतो वास फुलांना’ अशी धोंड यांची निर्मिती आहे.
(मृत्यू: ५ डिसेंबर २००७)

(Image Credit: लोकसत्ता)

१९०७

नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि ‘मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास’!
(मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)

१९०३

स्वामी रामानंद तीर्थ
१९९९ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

व्यंकटेश भगवानराव खेडगीकर तथा स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ
(मृत्यू: २२ जानेवारी १९७२)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल (२००१-२००२), गोव्याचे राज्यपाल (२००२-२००४), दिल्लीचे महापौर
(जन्म: २४ आक्टोबर १९२६)

१९९९

अकिओ मोरिटा

अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे सहसंस्थापक
(जन्म: २६ जानेवारी १९२१ - नागोया, आईची, जपान)

(Image Credit: ETHW)

१९५९

सख्याहरी

दत्तात्रय तुकाराम तथा ‘दत्तू’ बांदेकर ऊर्फ ‘सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
(जन्म: २२ सप्टेंबर १९०९)

(Image Credit: Book Ganga)

१८९१

एडवर्ड लूकास

एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती
(जन्म: ४ एप्रिल १८४२)

(Image Credit: Wikipedia)

१८६७

एलियास होवे

एलियास होवे – अमेरिकन संशोधक. याने ‘लॉक स्टिच’ प्रकारच्या शिवणयंत्राचा शोध लावला जे आजही वापरात आहे.
(जन्म: ९ जुलै १८१९)

(Image Credit: BIOGRAPHY)



Pageviews

This page was last modified on 02 October 2021 at 11:23pm