भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ‘इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली.
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७ - कोलकाता)
नारायण सदाशिव मराठे तथा ‘केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक
(मृत्यू: १ मार्च १९५५)
पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ‘नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
(मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
(मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
This page was last modified on 07 December 2021 at 8:58pm