स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.
दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.
(Image Credit: Cinemaazi)
पायोनिअर-१० हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले.
इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली.
प्रेम धवन – धरती के लाल (१९४६) या चित्रपटापासून त्यांनी आपल्या गीतलेखन कारकिर्दीला सुरुवात केली. ज़िद्दी (१९४६) या चित्रपटातील ‘चंदा रे जा रे’ या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. नंतर आरजू (१९५०), तराना (१९५१), बडी
बहू (१९५१), हमदर्द (१९५३), जागते रहो (१९५६), एक साल (१९५७), गेस्ट हाऊस (१९५९), हम हिंदुस्तानी (१९६०), काबूलीवाला (१९६१), शहीद (१९६५), एक फूल दो माली (१९६९), पवित्र पापी (१९७०) इ. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. अनिल
बिस्वास, सलील चौधरी आणि चित्रगुप्त या संगीतकारांबरोबर त्यांची विशेष जोडी जमली. १९७० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(मृत्यू: ७ मे २००१ - मुंबई)
(Image Credit: Cinemaazi)
इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(मृत्यू: १९ मार्च १९९८)
कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ‘दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.
(मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ - मुंबई)
गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ‘अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक
(मृत्यू: १६ मार्च १९४५)
जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ
(मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ - केम्ब्रिज, यु. के.)
कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)