-: दिनविशेष :-

२ आक्टोबर

जागतिक अहिंसा दिन
महात्मा गांधी जयंती
लाल बहादूर शास्त्री जयंती
बालसुरक्षा दिन
स्वच्छता दिन
गिनीचा स्वातंत्र्यदिन

महत्त्वाच्या घटना:

२००६

निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने अमिश समुदायाच्या एका शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

१९६९

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

१९६७

थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९५८

गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५५

पेरांबूर येथे ‘इन्टिग्रल कोच फॅक्टरी’ सुरू झाली.

१९५३

पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते आकाशवाणी पुणे केंद्राचे उद्घाटन झाले.

१९२५

जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९०९

रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१

कौशल इनामदार

कौशल इनामदार – संगीतकार व गायक

(Image Credit:  कौशल इनामदार)

१९६८

भरा
‘स्लाइस बॅकहॅन्ड’ मारताना

याना नोव्होत्‍ना – झेक लॉन टेनिस खेळाडू, १९९८ ची विम्बल्डन विजेती
(मृत्यू: १९ नोव्हेंबर २०१७)

१९४८

पर्सिस खंबाटा
स्टार ट्रेक या चित्रपटात

पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका, मिस इंडिया - १९६५
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

(Image Credit: Wikipedia)

१९४२

आशा पारेख

आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री

(Image Credit: Pinterest)

१९२७

पं. दिनकर कैकिणी

पं. दिनकर कैकिणी – आग्रा घराण्याचे शास्त्रीय गायक. पतियाळा घराण्याचे के. नागेश राव यांच्याकडून त्यांनी संगीत शिक्षणाची सुरुवात केली. कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर व आग्रा या दोन्ही घराण्यांचा उत्तम संगम दिसून येतो.
(मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

(Image Credit: राग श्रुति)

१९०८

गं. बा. सरदार

गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.’ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०)
(मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१९०४

लाल बहादूर शास्त्री
१९६६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान. (कार्यकाल: ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६), धवल क्रान्तीचे (Operation Flood) प्रणेते, ‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे उद्गाते. त्यांना ‘भारतरत्‍न’ (मरणोत्तर - १९६६) या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
(मृत्यू: ११ जानेवारी १९६६ - ताश्कंद, रशिया)

(Image Credit: Wikipedia)

१८९१

विनायक पांडुरंग करमरकर

विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२८ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६२)
अलिबागजवळ सासवणे येथे त्यांच्या कलाकृतींचे शिल्पालय आहे.
((मृत्यू: १३ जून १९६७)

(Image Credit: Alchetron)

१८६९

महात्मा गांधी
(मृत्यू: ३० जानेवारी १९४८ - नवी दिल्ली)

१८४७

पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

९७१

गझनीचा महमूद
(मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८५

रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता
(जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

१९७५

के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री, भारतरत्‍न
(जन्म: १५ जुलै १९०३)

१९२७

स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९०६

राजा रविवर्मा – चित्रकार
(जन्म: २९ एप्रिल १८४८)



Pageviews

This page was last modified on 03 October 2021 at 5:50pm