-: दिनविशेष :-

२७ फेब्रुवारी

जागतिक मराठी भाषा दिन

जागतिक नाट्य दिन


महत्त्वाच्या घटना:

२०१९

ज्ञानपीठ पुरस्कारांच्या धर्तीवर, केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ तर्फे ‘जनस्थान पुरस्कार’ देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे रूपये एक लाख, ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आतापर्यंतचे पुरस्कारप्राप्त मान्यवर पुढीलप्रमाणे आहेत:-
वसंत आबाजी डहाके (२०१९)
विजया राजाध्यक्ष (२०१७)
अरुण साधू (२०१५)
भालचंद्र नेमाडे (२०१३)
महेश एलकुंचवार (२०११)
ना. धो. महानोर (२००९)
बाबुराव बागुल (२००७)
नारायण सुर्वे (२००५)
मंगेश पाडगावकर (२००३)
श्री. ना. पेंडसे (२००१)
व्यंकटेश माडगूळकर (१९९९)
गंगाधर गाडगीळ (१९९७)
इंदिरा संत (१९९५)
विंदा करंदीकर (१९९३)
विजय तेंडुलकर (१९९१)

२००२

मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

२००१

जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ‘आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी

१९९९

पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक

१९५१

अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९००

ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३२

एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
(मृत्यू: २३ मार्च २०११)

१९२६

ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
(मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

१९१२

विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार
(मृत्यू: १० मार्च १९९९)

१८९४

कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १३ जून १८२२)

१८०७

एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी
(मृत्यू: २४ मार्च १८८२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७

श्यामलालबाबू हरलाल राय ऊर्फ ‘इंदीवर’ – गीतकार. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी सुमारे १००० गाणी लिहिली. १९४९ मध्ये ‘मल्हार’ चित्रपटातील ‘बडे अरमान से रख्खा हैं बलम तेरी कसम’ या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’ (१९७६) या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. ‘छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए’, ‘कस्मे वादे प्यार वफा सब’, ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती’, ‘दुल्हन चली वो पहन चली’, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे’, ‘चन्दन सा बदन, चंचल चितवन’, ‘मैं तो भूल चली बाबुल का देस’, ‘नदियां चले चले रे धारा’, ‘फूल तुम्हें भेजा है ख़त में‘, ‘जीवन से भरी तेरी आँखें’, ‘जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र’, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे‘, ‘हैं प्रीत जहाँ की रीत सदा’, ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’, ‘मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां’, ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा’, ‘होंठों से छू लो तुम’ अशी अनेक बहारदार गीते त्यांनी लिहिली आहेत.
(जन्म: १५ ऑगस्ट १९२४ - झांशी, उत्तर प्रदेश)

१९३६

इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ
(जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

१९३१

काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू
(जन्म: २३ जुलै १९०६)

१९८७

अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक
(जन्म: १७ एप्रिल १९१४)

१८९४

कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १३ जून १८२२)

१८८७

आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
(जन्म: ३१ मार्च १८६५)

१७१२

बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट
(जन्म: १४ आक्टोबर १६४३)Pageviews

This page was last modified on 11 August 2021 at 10:56pm