-: दिनविशेष :-

२६ नोव्हेंबर

संविधान दिन


महत्त्वाच्या घटना:

२००८

Mumbai under attack
ताज हॉटेल

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ‘लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.

(Image Credit: DNA)

१९९९

विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

१९९७

अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९६५

अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

१९४९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या भारताच्या संविधानास घटना समितिने या दिवशी मान्यता दिली आणि २६ जानेवारी १९५० पासून भारताचे संविधान अमलात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२

अर्जुन रामपाल – अभिनेता

१९५४

वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
(मृत्यू: १८ मे २००९)

१९३९

टीना टर्नर
BBC/Getty Images

टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री व नर्तिका, क्वीन ऑफ द रॉक अँड रोल

(Image Credit: biography.com)

१९२३

राजाराम दत्तात्रय तथा ‘राजा’ ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी)
(मृत्यू: २८ जुलै १९७५ - मुंबई)

१९२१

वर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ‘धवल क्रांती‘चे (Operation Flood) जनक, ‘अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६), पद्मविभूषण (१९९९), रॅमन मॅगसेसे पारितोषिक (१९६६) विजेते. ‘I too had a dream’ हे त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ - नडियाद, गुजराथ)

१८९०

सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक
(मृत्यू: २९ मे १९७७)

१८८५

देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २ जून १९७५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी

२००१

चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत.
(जन्म: ? ? ????)

१९९९

दत्तात्रय शंकर जमदग्नी – पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक
(जन्म: ? ? ????)

१९९४

भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी
(जन्म: २ मे १८९९)

१९८५

‘राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले.
(जन्म: ९ मार्च १८९९)



Pageviews

This page was last modified on 26 November 2021 at 10:52pm