दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर
पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
(२६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर)
दुसरे महायुद्ध - चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.
कॅप्टन जेम्स कूक एच. एम. एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
(Image Credit: The Guardian)
मायकेलअँजेलो याने ‘पिएटा’ (करुणा, the pity) या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली. मेरी व तिचा मुलगा जीझस यांचे संगमरवरात बनवलेले हे शिल्प सद्ध्या व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे आहे.
(Image Credit: विकिपीडिया)
अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
अनिल अवचट – लेखक व सामाजिक कार्यकर्ते
बी. व्ही. दोशी – प्रख्यात वास्तुविशारद
ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’, ‘लोकमान्य टिळक’, ‘हाजी पीर’, ‘सोनार
बांगला’, ‘भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: २९ मे २०१०)
मदर तेरेसा – भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)
अॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक, मानवतावादी समाजसुधारक. याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला.
(मृत्यू: ८ मे १७९४)
(Image Credit: Scientists of World)
ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: १ फेब्रुवारी १९१७)
नरेन्द्रनाथ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू (जन्म: ? ? ????)
चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या
‘द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.
(जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ‘केसरी’चे संपादक, ‘नवाकाळ’चे संस्थापक
(जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)
अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(जन्म: २४ आक्टोबर १६३२)
This page was last modified on 08 May 2021 at 2:17pm