श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
रशियाच्या ‘स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ‘लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
(Image Credit: The Times, London)
पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
अमेरिकेत ‘आयकर’ (Income Tax) सुरू झाला.
पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ‘द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले. सुरुवातीला हे आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे. १८५१ मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर झाले. १८६१ मध्ये त्याचे नाव ‘The Times of India’ असे करण्यात आले.
(Image Credit: Mumbai Heritage)
लक्ष्मीकांत बेर्डे – आपल्या अचुक टायमिंगने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणारे विनोदी अभिनेते
(मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
(Image Credit: IMDb)
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
(मृत्यू: २५ मे १९९८)
अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र (Welfare Economics) व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता
(मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
(Image Credit: Encyclopedia Britinnica)
पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २९ मे १९७२)
सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा
(मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
सदाशिव दत्तात्रय अमरापूरकर – मराठी व हिंदी चित्रपटांतील अभिनेते. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या २२ जून १८९७ या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१४)
(Image Credit: @FilmHistoryPic)
कैलाशपती मिश्रा – गुजरातचे १५ वे राज्यपाल (७ मे २००३ ते १२ जुलै २००४), बिहारचे अर्थमंत्री (१९७७), भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (१९९५ ते २००३), बिहार भाजपाचे भीष्मपितामह, जनसंघ व भाजपाचे नेते.
(जन्म: ५ आक्टोबर १९२३ - दुधारचक, बक्सर, बिहार)
(Image Credit: Wikipedia)
प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: १५ जानेवारी १९२०)
प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
(जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता
(जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
This page was last modified on 02 November 2021 at 3:20pm