-: दिनविशेष :-

१२ नोव्हेंबर

राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन


महत्त्वाच्या घटना:

२००३

शांघाय ट्रान्सरॅपिड’ या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२०००

२ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.

२०००

भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

१९९८

परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.

१९५६

मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३०

पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९२७

सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

१९१८

ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

१९०५

नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४०

अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
(मृत्यू: २७ जुलै १९९२ - मुंबई)

१९०४

श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
(मृत्यू: १ एप्रिल १९८९)

१८९६

डॉ. सालीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक
(मृत्यू: २० जून १९८७)

१८८०

पांडुरंग महादेव तथा ‘सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

१८१७

>बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक
(मृत्यू: २९ मे १८९२ - आक्रा, इस्त्राएल)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५

प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ
(जन्म: २१ जानेवारी १९२४)

१९९७

वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी
(जन्म: ? ? ????)

१९६९

इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती
(जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)

१९५९

सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

१९५९

केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ‘मजूर’ हे वृत्तपत्र काढले.
(जन्म: ९ मे १८८६)

१९४६

पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे (BHU)एक संस्थापक
(जन्म: २५ डिसेंबर १८६१)Pageviews

This page was last modified on 10 September 2021 at 7:29pm