सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना
पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ‘एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.
के. एल. एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.
हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.
हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस
जहीर खान – जलदगती गोलंदाज
(Image Credit: ESPN CricInfo)
आश्विनी भिडे-देशपांडे – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, ख्याल, भजन, ठुमरी असे प्रकारही त्यांनी हाताळले आहेत.
(Image Credit: Raag Shruti)
व्लादिमीर पुतिन – रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष
अख़्तरीबाई फ़ैजाबादी उर्फ बेगम अख़्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.
(मृत्यू: ३० आक्टोबर १९७४)
(Image Credit: Wikipedia)
विनायक महादेव तथा ‘वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक
(मृत्यू: १३ मे २०१० - पुणे)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
प्रागजी जमनादास डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
(मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)
(Image Credit: IndiaNetzone)
हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी
(मृत्यू: २९ एप्रिल १९४५)
(Image Credit: Smithsonian Magazine)
नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९२२) मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)
(Image Credit: Wikipedia)
कृष्णाजी केशव दामले तथा ‘केशवसुत ’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ‘केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा’ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
(जन्म: १५ ऑगस्ट १९२९ - अहमदनगर)
भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री
(जन्म: ? ? ????)
(Image Credit: Vartak Polytechnic)
देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत
(जन्म: १८ जानेवारी १८८९ - मुळबागल, कोलार, कर्नाटक)
(Image Credit: Wikipedia)
एडगर अॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक, कवी, संपादक व समीक्षक
(जन्म: १९ जानेवारी १८०९)
(Image Credit: Wikipedia)
This page was last modified on 06 October 2021 at 11:14pm