मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली. २१ मार्च १९७७ रोजी ही आणीबाणी उठवण्यात आली. देशाच्या राजकारणातील हा काळा कालखंड (तोपर्यंतचा) मानला जातो.
मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.
महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
सई ताम्हनकर – अभिनेत्री
व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू
करिश्मा कपूर – अभिनेत्री
सतीश शहा – विनोदाचे अप्रतिम टायमिंग साधणारे चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते. FTII मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली. जाने भी दो यारों (१९८३) हा चित्रपट व ये जो हैं ज़िन्दगी, साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकांतील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे
(मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
मदनमोहन – संगीतकार
(मृत्यू: १४ जुलै १९७५)
एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार
(मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
(मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)
रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
(जन्म: ????)
अण्णासाहेब मगर – पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
(जन्म: ????)
सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी
(जन्म: ? ? १८८२)
This page was last modified on 28 August 2021 at 10:36pm