-: दिनविशेष :-

१० मे


महत्त्वाच्या घटना:

१९९३

तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसर्‍यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. एका वर्षाच्या आत हे शिखर दोनदा सर करणारी ती जगातील पहिली महिला बनली.

१९९४

नेल्सन मंडेला दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८१

फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.

१९७९

मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.

१९४०

दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.

१९४०

दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेन यांनी राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी

१९३७

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता

१९०७

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

१८१८

इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. [वैशाख शु. ५ शके १७४०]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६

पेंटाला हरिकृष्ण

पेंटाला हरिकृष्ण – बुद्धीबळपटू

(Image Credit: via Wikimedia Commons)

१९४०

माणिकराव गोडघाटे ऊर्फ ‘ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी
(मृत्यू: २६ मार्च २०१२)

१९३२

जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी
(मृत्यू: ३ मे २०११)

१९२७

नयनतारा सहगल – भारतीय लेखिका

१९१८

रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
(मृत्यू: २० जानेवारी २००२)

१९१४

ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स]
(मृत्यू: २१ सप्टेंबर १९९२)

१९०९

बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, स्वतंत्र भारताचे प्रमुख ग्रंथपाल (१९४७ - १९६२), ग्रंथसूचीकार, पद्मश्री, ‘इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक
(मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)

१९०५

पंकज मलिक – गायक व संगीतकार
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)

१२६५

फुशिमी – जपानचा सम्राट
(मृत्यू: ८ आक्टोबर १३१७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५

निनाद गंगाधर बेडेकर – इतिहास संशोधक, लेखक आणि वक्ते
(जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

२०१०

मॅक मोहन

मोहन माकिजानी ऊर्फ ‘मॅक मोहन’ – हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने खलनायकाच्या किंवा खलनायकाच्या टोळक्यातील भूमिका साकारणारे अभिनेते. चेतन आनंद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी प्रथम दिग्दर्शनास सुरुवात केली. परंतु शौकत कैफ़ी यांच्या सल्ल्यामुळे ते नंतर ते अभिनयाकडे वळले. हक़ीक़त (१९६४) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी डॉन, कर्ज़, सत्ते पे सत्ता, ज़ंजीर, रफ़ू चक्कर, खून पसीना इ. २०० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. परंतु शोले या चित्रपटातील ‘सांभा’ या भूमिकेने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ते क्रिकेटही उत्तम खेळत असत.
(जन्म: २४ एप्रिल १९३८ - कराची, सिंध, पाकिस्तान)

(Image Credit: IMDb)

२००२

सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी’ – शायर व गीतकार
(जन्म: १४ जानेवारी १९१९)

२००१

सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३), हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
(जन्म: २१ ऑगस्ट १९३४)

२०००

नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.’ देशपांडे – कवी
(जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

१९९८

यदुनाथ थत्ते

यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, ‘साधना‘ मासिकाचे संपादक
(जन्म: ५ आक्टोबर १९२२)

(Image Credit: Wikipedia)

१७७४

लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १५ फेब्रुवारी १७१०)



Pageviews

This page was last modified on 03 October 2021 at 11:45pm