-: दिनविशेष :-

१६ फेब्रुवारी

लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन


महत्त्वाच्या घटना:

१९८५

लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.

१९५९

फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे १५ वे पंतप्रधान बनले (कार्यकाल: १६ फेब्रुवारी १९५९ ते २ डिसेंबर १९७६). यानंतर ते क्युबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. (कार्यकाल: २ डिसेंबर १९७६ ते २४ फेब्रुवारी २००८)

१९१८

लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.

१७०४

औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८

वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू

१९६४

बेबेटो

बेबेटो – ब्राझीलचा फुटबॉलपटू

(Image Credit: worldfootball.net)

१९५४

मायकेल होल्डिंग

मायकेल होल्डिंग – ‘Whispering Death’ नावाने प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा (जमैका) जलदगती गोलंदाज

(Image Credit: Sports Corner)

१८७६

र. पु. परांजपे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू,(अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९) व ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्‍चायुक्त (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
(मृत्यू: ६ मे १९६६)

(Image Credit: नवाकाळ)

१७४५

माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ‘थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा, १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.
(मृत्यू: १८ नोव्हेंबर १७७२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

रंजन साळवी – ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

२०००

बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, स्वतंत्र भारताचे प्रमुख ग्रंथपाल (१९४७ - १९६२), ग्रंथसूचीकार, पद्मश्री, ‘इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक
(जन्म: १० मे १९०९)

१९९६

आर. डी. आगा – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक
(जन्म: ? ? ????)

१९९४

पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(जन्म: ४ जुलै १९१२)

१९६८

रावबहादूर नारायणराव बोरावके

नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९३३ मध्ये त्यांना ‘रावसाहेब’ तर १९४६ मध्ये त्यांना ‘रावबहादूर’ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला.
(जन्म: १७ आक्टोबर १८९२)

(Image Credit: The Saswad Mali Sugar Factory)

१९५६

मेघनाद साहा

मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले.
(जन्म: ६ आक्टोबर १८९३)

(Image Credit: Wikipedia)

१९४४

धुंडिराज गोविंद ऊर्फ ‘दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत.
(जन्म: ३० एप्रिल १८७० - त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)



Pageviews

This page was last modified on 16 October 2021 at 8:23pm