-: दिनविशेष :-

१९ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

२००३

तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

१९४२

जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या (Executive Order No. 9066). अशा सुमारे १, १७, ००० लोकांना बंदिवासात (Internment Camps) ठेवण्यात आले होते. मात्र नंतर १० ऑगस्ट १९८८ रोजी अशा बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

१८८४

यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला एकाच दिवसात लहानमोठ्या ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

१८७८

फोनोग्राफ

थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.
(U.S. Patent No. 200, 521)

(Image Credit: CTG Publishing)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६२

हॅना मंडलिकोव्हा

हॅना मंडलिकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू

(Image Credit: Rearview Mirror)

१९२२

सरदार बियंत सिंग – ‘खलिस्तानी’ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री
(मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

१९१९

अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ‘गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती.
(मृत्यू: २४ आक्टोबर १९९२)

१९०६

माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक
(मृत्यू: ५ जून १९७३)

१८५९

स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज
(मृत्यू: २ आक्टोबर १९२७)

१६३०

छत्रपती शिवाजी महाराज
(मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

१४७३

निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
(मृत्यू: २४ मे १५४३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

अनंत पुरुषोत्तम मराठे – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते. रामशास्त्री या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिका तसेच शहीद या हिंदी चित्रपटात त्यांनी केलेली शिवराम राजगुरू यांची भूमिका या विशेष गाजल्या होत्या.
(जन्म: ? ? १९२९)

१९९७

राम कदम – संगीतकार
(जन्म: २८ ऑगस्ट १९१८)

१९९७

डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते
(जन्म: २२ ऑगस्ट १९०४)

१९७८

पंकज मलिक – गायक व संगीतकार
(जन्म: १० मे १९०५)

१९५६

आचार्य नरेन्द्र देव – प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते व उत्तर प्रदेशातील आमदार
(जन्म: ? ? १८८९)

१९५६

केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
(जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

१९१५

गोपाळ कृष्ण गोखले
१९६६ मध्ये जारी झालेले पोस्टाचे तिकीट

नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक
(जन्म: ९ मे १८६६)

(Image Credit: विकिपीडिया)

१८१८

Senapati Bapu Gokhale.jpg
By Anonymous - New History of the Marathas. Vol III. (1948) - Govind Sakharam Sardesai Public Domain Link

पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती नरहर गणेश तथा सरदार बापू गोखले यांचे वर्ध्याजवळील आष्टी येथे निधन
(जन्म: ? ? १७७७)

(Image Credit: Wikimedia Commons)Pageviews

This page was last modified on 08 May 2021 at 11:46pm