-: दिनविशेष :-

१४ जानेवारी

भूगोल दिन

मकर संक्रमण


महत्त्वाच्या घटना:

२०००

ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ‘बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

१९९८

दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१९९४

मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.

१९४८

‘लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

१९२३

विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१७६१

मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७

नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर

१९३१

सईद अहमद शाह ऊर्फ ‘अहमद फराज’ – ऊर्दू शायर
(मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)

१९२६

महाश्वेता देवी – बंगाली लेखिका

१९१९

सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी‘ – शायर व गीतकार
(मृत्यू: १० मे २००२)

१९०५

दुर्गा खोटे
सीतेच्या भूमिकेत (१९३४)

दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ‘मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. पद्मश्री (१९६८), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८३)
(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)

(Image Credit: Wikipedia)

१८९६

‘रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख
(मृत्यू: २ आक्टोबर १९८२)

१८९२

शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
(मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)

१८८२

रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र
(मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)

१८८३

निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर
(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते
(जन्म: ? ? ????)

१९९१

चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ‘चित्रगुप्त’ – संगीतकार
(जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)

१७६१

सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती
(जन्म: ४ ऑगस्ट १७३०)

१७६१

विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
(जन्म: २ मार्च १७४२)

१७४२

एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)Pageviews

This page was last modified on 24 October 2021 at 11:33pm