अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारला. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आहेत.
[कार्यकाल: २० जानेवारी २००९ ते २० जानेवारी २०१७]
गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ‘पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
चीन व नेपाळ या देशांत सीमा करार झाला.
महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी १९३४ मध्ये एकदा आणि १९४४ मध्ये दोनदा त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते.
दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी २० जानेवारी या दिवशी करण्याची प्रथा पडली.
[कार्यकाल: ४ मार्च १९३३
ते १२ एप्रिल १९४५]
ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ‘मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ‘वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली.
(मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
(Image Credit: Jaipur Guni Jan Khana)
सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १० जून १८३६)
रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
(जन्म: १० मे १९१८)
ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना
ऑस्कर पुरस्कार मिळाला.
(जन्म: ४ मे १९२९)
(Image Credit: Wikimedia Commons)
खान अब्दुल गफार खान उर्फ ‘सरहद गांधी’ उर्फ ‘बादशाह खान’ उर्फ ‘बच्चा खान’ – वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी, त्यांनी १९२९ मध्ये ‘खुदाई खिदमतगार’ (अर्थ: ईश्वराचे सेवक)
या संघटनेची स्थापना केली. हे वायव्य प्रांतातील स्वातंत्र्यासाठी केलेले अहिंसक आंदोलन होते. भारतरत्न (१९८७) पुरस्काराने गौरव झालेले ते पहिले अभारतीय होत.
(जन्म: ३ जून १८९०)
कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
(जन्म: १९ डिसेंबर १८९४)
अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ‘ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक
(जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ३ जून १८६५)
डेविड कालाकौआ – हवाईचा राजा
(जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
This page was last modified on 19 October 2021 at 11:23pm