-: दिनविशेष :-

३ ऑगस्ट

नायजरचा स्वातंत्र्य दिन


महत्त्वाच्या घटना:

२००४

राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.

२०००

मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ‘नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.

१९९४

संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९९४

सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

१९६०

नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९००

फायरस्टोन

‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.

१७८३

जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू

१९२४

लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)

१९१६

शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर
(मृत्यू: २० एप्रिल १९७० - मुंबई)

१९००

क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ‘पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार
(मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

१८९८

उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून ‘शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ‘काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या.
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

१८८६

मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
(मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००७

सरोजिनी वैद्य – लेखिका
(जन्म: १५ जून १९३३)

१९९३

स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू
(जन्म: ८ मे १९१६)

१९५७

देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स’चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव
(जन्म: ३ ऑगस्ट १९५७ - दरबान, दक्षिण अफ्रिका)

१९३०

‘विज्ञान यात्री’ व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले होते.
(जन्म: १२ जानेवारी १८५४)



Pageviews

This page was last modified on 07 May 2021 at 3:32pm