-: दिनविशेष :-

७ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००९

केपलर स्पेस टेलिस्कोप
नासाने जारी केलेले रेखाचित्र

सूर्याखेरीज इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीएवढ्या आकाराचे ग्रह शोधण्यासाठी केपलर स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीचे प्रक्षेपण करण्यात आले. १० वर्षात या दुर्बिणीने सुमारे २,६०० बाह्यग्रहांचा शोध घेतला. सुमारे दहा वर्षे सेवा करून ३० ऑक्टोबर २०१८ रोजी इंधन संपल्यामुळे ही दुर्बीण निवृत्त झाली.

(Image Credit: NASA)

२००६

लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

१९३६

दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

१८७६

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

अनुपम खेर
राजश्री प्रॉडक्शन्सच्या सारांश (१९८४) या चित्रपटात

अनुपम खेर – चित्रपट अभिनेता

(Image Credit: scroll.in)

१९५२

Embed from Getty Images

सर विवियन रिचर्ड्‌स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९३४

नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक

१९११

सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ‘अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार
(मृत्यू: ४ एप्रिल १९८७ - नवी दिल्ली)

१९०४

राईनहार्ड हायड्रीच या अत्यंत क्रूर नाझी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. तो इतका क्रूर होता, की खुद्द हिटलरने सुद्धा त्याचे वर्णन ‘The man with the iron heart’ असे केले होते.
(मृत्यू: ४ जून १९४२)

१८४९

ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ
(मृत्यू: ११ एप्रिल १९२६)

१७९२

सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक
(मृत्यू: ११ मे १८७१)

१५०८

हुमायून – दुसरा मुघल सम्राट
(मृत्यू: १७ जानेवारी १५५६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

रवि शंकर शर्मा ऊर्फ ‘रवि’ – संगीतकार
(जन्म: ३ मार्च १९२६)

२०००

प्रभाकर तामणे

प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक. त्यांनी पटकथा लिहिलेले ‘एक धागा सुखाचा’, ‘मधुचंद्र’, ‘रात्र वादळी काळोखाची’ यांसारखे मराठी चित्रपट गाजले. तसंच त्यांच्या कथेवर राज कपूरने काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा विनोदी सिनेमाही बऱ्यापैकी गाजला होता.
(जन्म: २९ आक्टोबर १९३१)

(Image Credit: Bytes of India)

१९९३

इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक
(जन्म: २६ आक्टोबर १९००)

१९६१

गोविंद वल्लभ पंत

गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली.
(जन्म: १० सप्टेंबर १८८७)

१९२२

गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या
(जन्म: १५ ऑगस्ट १८६७)

१६४७

दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू (जन्म: ?? १५७७)Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 8:45pm