सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
१२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
रशियाने ’ल्यूना-१०’ हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या बांधमाकास सुरुवात झाली. ४ डिसेंबर १९२४ रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले.
पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
पॅरिसमधील ‘आयफेल टॉवर’चे उद्घाटन झाले. २८ जानेवारी १८८७ रोजी यांच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सुमारे सव्वा दोन वर्षांत म्हणजे १५ मार्च १८८९ रोजी तो बांधून पूर्ण झाला. वॉशिंग्टन स्मारकाला मागे टाकून ही त्याकाळातील सर्वात उंच मानवनिर्मित वास्तू बनली. ४१ वर्षे हा विक्रम अबाधित होता. १९३० मध्ये न्यूयॉर्क मधील क्रायस्लर बिल्डिंगने तो मोडला. हा टॉवर ३२४ मी. (सुमारे ८१ मजली इमारतीएवढा) उंच आहे. तिकीटविक्रीतून जगात सर्वाधिक पैसे मिळवणारी ही वास्तू आहे.
(Image Credit: विकिपीडिया)
डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
(मृत्यू: २० जुलै २०१९)
‘कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
(मृत्यू: ३० जुलै १९६०)
आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)
बळवंत पांडुरंग तथा ‘अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार
(मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
रेनें देंकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: १० जुलै १५५९)
गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू
(मृत्यू: २८ मार्च १५५२)
गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष
(जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज
(जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
महजबीन बानो ऊर्फ ‘मीनाकुमारी’ – अभिनेत्री
(जन्म: १ ऑगस्ट १९३२)
रावबहादूर दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
(जन्म: २७ नोव्हेंबर १८७०)
जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार
(जन्म: १७ एप्रिल १८३७)
This page was last modified on 23 August 2021 at 11:45pm