देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची, साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. ‘इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना’ असे त्याचे नाव आहे.
चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश
‘एअर इंडिया’ची मुंबई - न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
(Image Credit: Mumbai Heritage)
पोलंडमधील वॉर्सा येथे सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणाचा करार झाला. ‘वॉर्सा करार’ या नावाने ओळखला जाणारा हा करार ‘नाटो करारा’ला प्रतिशह म्हणून करण्यात आला. हा करार १ जुलै १९९१ रोजी संपुष्टात आला.
दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. जेम्स फिलीप हा देवीच्या लशीचे संशोधक सर एडवर्ड जेन्नर यांच्या माळ्याचा मुलगा होता.
तरुणी सचदेव – ‘रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार
(मृत्यू: १४ मे २०१२)
डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)
मृणाल सेन – दिग्दर्शक
(मृत्यू: ३० डिसेंबर १९१८)
वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: ४ जुलै १९९९)
फील्ड मार्शल आयुब खान – पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १९ एप्रिल १९७४)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज – मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती (१६ जानेवारी १६८१ ते ११ मार्च १६८९), छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव
(मृत्यू: ११ मार्च १६८९ - तुळापूर, पुणे)
(Image Credit: @MulaMutha)
‘रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव हिचा नेपाळमध्ये विमान अपघातात मृत्यू
(जन्म: १४ मे १९९८)
(Image Credit: विकिपीडिया)
फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
(जन्म: १२ डिसेंबर १९१५)
(Image Credit: Wikipedia)
जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
(जन्म: १६ जुलै १९१७)
भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य आणि राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे ते जाणकार होते.
(जन्म: ३० डिसेंबर १९०२)
सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६), इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना
समाजाचे प्रमुख (१८९६), सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद
(जन्म: २ डिसेंबर १८५५ - होन्नावर,
उत्तर कन्नडा, कर्नाटक)
This page was last modified on 11 December 2021 at 6:26pm