-: दिनविशेष :-

८ जून

जागतिक महासागर दिन
World Oceans Day
जागतिक मेंदू कर्करोग जागरूकता दिन
World Brain Tumour Awareness Day

महत्त्वाच्या घटना:

२००४

आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

१९६९

भारताचे लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्‍च लष्करी पद देण्यात आले.

१९५३

कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

१९४९

जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली

१९४८

मुंबई - लंडन विमानसेवा
First Flight Cover

‘एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली. कैरो आणि जिनीव्हा येथे विराम घेऊन, १० जून १९४८ रोजी हे विमान लंडनला पोहोचले. पहिल्या फेरीत ४२ प्रवासी होते. त्यातले बरेचसे महाराजे आणि नबाब होते.

(Image Credit: Indian Airmails)

१९४१

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

१९१८

नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध

१९१५

लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

१९१२

कार्ल लेम्ले यांनी ‘यूनिव्हर्सल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना केली.

१७१३

मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

१७०७

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

१६७०

पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५७

डिंपल कपाडिया

डिंपल कपाडिया – अभिनेत्री

(Image Credit: Filmfare)

१९३२

रे इलिंगवर्थ
गॅरी सोबर्सचा त्रिफळा उडवताना

रे इलिंगवर्थ – इंग्लिश क्रिकेटपटू

(Image Credit: ESPN cricinfo)

१९३१

राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते
(मृत्यू: १३ फेब्रुवारी २००८)

१९२१

सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २७ जानेवारी २००८)

१९१७

गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार
(मृत्यू: २ एप्रिल २००९)

१९१०

दिनकर केशव तथा ‘दि. के.’ बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक
(मृत्यू: २ मे १९७३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९५

राम नगरकर – विनोदी नट, ‘रामनगरी’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाचे ७०० हुन अधिक प्रयोग झाले.
(जन्म: ? ? ????)

१९८१

गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार, लेखक आणि पत्रकार. भिडे यांनी ‘व्यावहारिक ज्ञानकोश’ (५ खंड), ‘अभिनव ज्ञानकोश’, ‘बालकोश’ अशा कोशांचे संपादन केले. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’, ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’ आदी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘सिनेमासृष्टी’ हे मराठीतील चित्रपट-नाट्य विषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले.
(जन्म: ६ जून १९०९)

१८४५

अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १५ मार्च १७६७)

१८०९

थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक
(जन्म: २९ जानेवारी १७३७)

१७९५

लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २७ मार्च १७८५)

६३२

मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक
(जन्म: २६ एप्रिल ५७० – मक्का, सौदी अरेबिया)



Pageviews

This page was last modified on 06 June 2021 at 11:07pm