पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
चित्रकार रवी परांजपे यांना ‘कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ‘आय. एन. एस. विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले.
अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.
व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
दीना पाठक – अभिनेत्री, आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १३० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
(मृत्यू: ११ आक्टोबर २००२ - मुंबई)
(Image Credit: Film History Pics)
पी. ए. संगमा – ११ व्या लोकसभेचे सभापती (कार्यकाल: २३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८) आणि मेघालयचे ४ थे मुख्यमंत्री (कार्यकाल: ६ फेब्रुवारी १९८८ ते २५ मार्च १९९०), प्राध्यापक, वकील, पत्रकार
(जन्म: १ सप्टेंबर १९४७)
(Image Credit: One India)
अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
(जन्म: ८ जानेवारी १९२४)
विठ्ठल गोविंद गाडगीळ – ‘एअर इंडिया’चे पहिले कर्मचारी, भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे
(जन्म: ? ? ????)
आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार
(जन्म: ? ? ????)
इफ्तिखार – चरित्र अभिनेता
(जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
शांताबाई परुळेकर – ‘सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका
(जन्म: ? ? ????)
वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २३ जुलै १८८६)
सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ
(जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ - आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ‘भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
(जन्म: १२ डिसेंबर १८७२)
This page was last modified on 10 October 2021 at 11:29pm