हा या वर्षातील २४५ वा (लीप वर्षातील २४६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
१९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९४५ : व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.
१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.
१९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.
१९१६ : पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३ : अहमदशाह मसूद – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)
१९५२ : जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री
१८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस - पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)
१८७७ : फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : श्रीनिवास खळे – संगीतकार (जन्म: ३० एप्रिल १९२६)
२००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: ८ जुलै १९४९)
१९९९ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ - पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)
१९९० : नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म: ३ आक्टोबर १९०७)
१९७६ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी ’कुमार’ या टोपणनावाने कविता लेखन तर ’आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (जन्म: १९ जानेवारी १८९८)
१९६९ : हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९०)
१९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक, त्यांनी पुणे व मुंबई येथील सर्व स्थावर मालमत्ता संस्थेस देणगी दिली. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविज्ञा विभागातर्फे मिळणाऱ्या प्रतिवार्षिक अनुदानावर संस्थेचा खर्च चालतो. (जन्म: ? ? ????)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 19 February, 2014 18:48