हा या वर्षातील ३५१ वा (लीप वर्षातील ३५२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९७० : जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
१९२८ : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७ : हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१७७७ : फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१७१८ : ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८ : रितेश देशमुख – अभिनेता
१९७२ : जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
१९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
१९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
१९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०) (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
१९०१ : यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
१९०० : मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
१८४९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
१७७८ : सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
२००० : जाल पारडीवाला – अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक (जन्म: ? ? ????)
१९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९०६)
१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० - गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
१९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
१९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ - चांचल, माल्डा, बांगला देश)
१९३३ : थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
१९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
१९०७ : लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
१७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले. (जन्म: ? ? ????)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 21 February, 2014 13:25