हा या वर्षातील १२० वा (लीप वर्षातील १२१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००९ : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना: १९२५)
१९९६ : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.
१९९५ : ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९७७ : ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
१९३६ : वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१७८९ : जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
१६५७ : शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करुन ते लुटले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८७ : रोहित शर्मा – क्रिकेटपटू
१९२६ : श्रीनिवास खळे – संगीतकार (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)
१९१० : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९८३)
१९०९ : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ (मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)
१८७० : धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)
१७७७ : कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००३ : वसंत पोतदार – मराठी साहित्यिक (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ - आष्टी, उस्मानाबाद)
२००१ : श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)
१९४५ : नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म: २० एप्रिल १८८९)
१९१३ : मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)
१८७८ : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली. [चैत्र व. १३ शके १८००] (जन्म: ? ? ????)
१०३० : गझनीचा महमूद (जन्म: २ आक्टोबर ९७१)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 15 February, 2014 0:55