हा या वर्षातील ३५९ वा (लीप वर्षातील ३६० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९१ : मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
१९९० : वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
१९७६ : ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९ : नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
१९३२ : प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
१९२७ : पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
१९२६ : डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)
१९२६ : चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (मृत्यू: ५ आक्टोबर १९९७)
१९२४ : अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
१९१९ : नौशाद अली – संगीतकार (मृत्यू: ५ मे २००६)
१९१८ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ आक्टोबर १९८१)
१९११ : बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ - पॅरिस, फ्रान्स)
१८७६ : बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
१८६१ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
१६४२ : सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (मृत्यू: २० मार्च १७२७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८ : दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक (? ? १९२५)
१९९५ : डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
१९९४ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
१९७७ : चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (जन्म: १६ एप्रिल १८८९)
१९७२ : चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (जन्म: १० डिसेंबर १८७८)
१९५७ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस - पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 2 May, 2014 13:54