-: दिनविशेष :-

२२ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९९५

घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय

१९९५

श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.

१९८२

कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर यांचे नेपथ्य असलेल्या ‘पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९८०

इराकने इराण पादाक्रांत केले.

१९३१

नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१८८८

द नॅशनल जिऑग्रॉफिक
जानेवारी १९१५ च्या अंकाचे मुखपृष्ठ

‘द नॅशनल जिऑग्रॉफिक मॅगेझीन’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

(Image Credit: विकिपीडिया)

१६६०

पन्हाळगड

शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

(Image Credit: MTDC)

१४९९

स्वित्झर्लंड

बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

(Image Credit: Wikipedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१५

अनंत माने

अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ‘पिंजरा’, ‘लक्ष्मी’, ‘सुशीला’, ‘आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ९ मे १९९५)

(Image Credit: दैनिक लोकमत)

१९०९

सख्याहरी

दत्तात्रय तुकाराम तथा ‘दत्तू’ बांदेकर ऊर्फ ‘सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
(मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)

(Image Credit: Book Ganga)

१८८७

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (१९५९)
(मृत्यू: ९ मे १९५९)

(Image Credit: Facebook)

१८६९

व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते
(मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१७९१

मायकेल फॅरेडे
थॉमस फिलिप्स याने काढलेले तैलचित्र (१८४२)

मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

मन्सूर अली खान पतौडी

मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (१९५२ - १९७१). अर्जुन अवॉर्ड (१९६४), पद्मश्री (१९६७)
(जन्म: ५ जानेवारी १९४१)

(Image Credit: Wikipedia)

१९९४

जी. एन. जोशी

जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.
(जन्म: ६ एप्रिल १९०९)

(Image Credit: Mohan Nadkarni)

१९७०

शरदेन्दू बंदोपाध्याय

शरदेन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक. ‘ब्योमकेश बक्षी’ या गुप्तहेर पात्राचे निर्माते.
(जन्म: ३० मार्च १८९९)

(Image Credit: Wikipedia)

१९९१

दुर्गा खोटे
मुघल-ए-आझम (१९६०)

दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ‘मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. पद्मश्री (१९६८), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८३)
(जन्म: १४ जानेवारी १९०५)

(Image Credit: Wikipedia)

१९५६

फ्रेडरिक सॉडी

फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते (१९२१) इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २ सप्टेंबर १८७७)

(Image Credit: Wikipedia)

१५३९

गुरू नानक देव

गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
(जन्म: १५ एप्रिल १४६९)

(Image Credit: mPanchang)



Pageviews

This page was last modified on 01 May 2022 at 1:46pm