हा या वर्षातील ३१९ वा (लीप वर्षातील ३२० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
१९९९ : रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान
१९९६ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
१९८९ : सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४५ : व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६ : सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू
१९४८ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)
१९२९ : शिरीष पै – कवयित्री
१९२७ : उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)
१९१७ : दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)
१८९१ : एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)
१८८५ : गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ - भावनगर, गुजराथ)
१८७५ : बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)
१७३८ : विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (जन्म: ? ? १९३१)
१९९६ : डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)
१९८२ : आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न - १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
१९४९ : नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी (जन्म: १९ मे १९१०)
१९४९ : नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी (जन्म: ?? ???? १९२५)
१६३० : योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 28 February, 2014 15:08