हा या वर्षातील २७६ वा (लीप वर्षातील २७७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९५ : ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
१९९० : पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
१९३५ : जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
१९३२ : इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
१६७० : शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९ : जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक
१९२१ : रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६)
१९१९ : जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)
१९१४ : म. वा. धोंड – टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)
१९०७ : नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)
१९०३ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६)
१९९९ : अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २६ जानेवारी १९२१)
१९५९ : दत्तात्रय तुकाराम तथा ‘दत्तू’ बांदेकर ऊर्फ ‘सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
(जन्म: २२ सप्टेंबर १९०९)
१८९१ : एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२)
१८६७ : एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 26 January, 2014 23:33