हा या वर्षातील १८९ वा (लीप वर्षातील १९० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०११ : रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs. ) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.
२००६ : मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९९७ : बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
१९५८ : बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९३० : किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ‘इंडिया हाऊस’चे उद्‍घाटन
१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१८८९ : ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.
१८५६ : चार्ल्स बर्न याल ‘मशिनगन’चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१४९७ : वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२ : सौरव गांगुली – भारताचा क्रिकेट कर्णधार
१९४९ : वाय. एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री (मृत्यू: २ सप्टेंबर २००९)
१९२८ : श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
(मृत्यू: १८ जून १९९९)
१९२२ : अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (मृत्यू: १९ एप्रिल २००९)
१९१६ : गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रेजैत’ या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले. (मृत्यू: १ जून १९९८)
१९१४ : ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
१८३९ : जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक (मृत्यू: २३ मे १९३७)
१७८९ : ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००३ : ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
२००१ : तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन (जन्म: ? ? ????)
१९९४ : डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक (जन्म: ? ? ????)
१९९४ : किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९८४ : कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
१९६७ : विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१८३७ : विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१६९५ : क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (जन्म: १४ एप्रिल १६२९)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 3 March, 2014 18:32